मुंबई : मुंबई आणि बदलापूरला मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका प्रस्तावित केल्या असून ३८ किमीची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे. मेट्रो १४ मार्गिकेच्या पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करण्यासह वन आणि पर्यावरणासंबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
विद्यार्थ्याचा मृत्यू होताच नवी मुंबई मनसेची इमॅजिका पार्कला धडक
सल्लागाराच्या नियुक्तीसाठी नुकतीच एमएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सल्लागाराची नियुक्ती आणि पुढील कार्यवाही करून वर्षभरात मेट्रो १४ मार्गिकेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, मिरा-भाईंदर, ठाणेवासियांपाठोपाठ बदलापूरवासियांचेही मेट्रोचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल.