Monday, May 12, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक

Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यामधील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली आहे.


या महिलेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. जयकुमार गोरेंनी स्वत:चे ३६० नग्न फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेने केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात त्यांना निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याचे सांगितले होते. मात्र आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.



जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती


जयकुमार गोरे यांना महिलेला शरीराच्या काही अवयवांचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१७ साली न्यायालयात गेले होते. २०१९ साली न्यायालयाने आपल्याला याप्रकरणात निर्दोष मुक्त केल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना महिलेने म्हटले की, जयकुमार गोरे यांनी माझ्यासमोर साक्षात दंडवत घालत माफी मागितली होती. त्यामुळे मी केस मागे घेतली होती. माझ्या मागे कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटी खंबीर आहे असे महिलेने म्हटले होते.

Comments
Add Comment