नाशिक : नाशिकमधील (Nashik News) निफाड तालुक्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला ही आग लागली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश आले. मात्र यामध्ये १५ ते २० दुकाने जळून खाक (Nashik Fire) झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे.
IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या Kirsty Coventry, जय शाह यांनी दिल्या शुभेच्छा
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग लागली. घोडके नगर परिसरात असलेल्या एचडीएफसी बँक च्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानालाही आग लागली होती. तसेच त्या नजीकच्या भेळ भत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली. या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने रौद्ररूप धारण केले. त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारीला देखील ही आग लागली. त्यामुळे आग आणखी भडकली. आग एवढी भीषण होती की ओझर एच एल, पिंपळगाव बसवंत, निफाड येथून तीन अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. (Nashik Fire)
दरम्यान, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर द्यापही काही ठिकाणी ही आग भडकत असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी तळ ठोकून आहे. (Nashik Fire)