मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचे पडसाद उमटले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशाला न्याय मिळावा म्हणून विधानसभेत महायुतीचे नेते पुढे आले आहेत. अशातच काल(दि २० ) विधानसभेत चित्रा वाघ (chitra wagh) यांनी दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. त्यांच्या या कृतीचं खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक केलं आहे.
दिशा सालियनच्या ( Disha Salian ) मृत्यूनंतर ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेतही गदारोळ झाला. दिशाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली आहे. या चौकशीचा अहवाल कधी येणार ? हा अहवाल सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी विधानसभेत केली. यावर आता खासदार नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांची पाठ कौतुकाने थोपटली आहे.
वा! चित्राताई वाघ वा!@ChitraKWagh pic.twitter.com/J7SI6EhE1P
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 21, 2025
ट्विट करत काय म्हणाले खासदार नारायण राणे ?
“छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांच्याही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरव केला असता. लगे रहो चित्राताई” म्हणत खासदार नारायण राणे यांनी चित्रा वाघ यांचं कौतुक केलं.
वा! चित्राताई वाघ वा!@ChitraKWagh pic.twitter.com/J7SI6EhE1P
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 21, 2025
दरम्यान खासदार नारायण राणे यांच्या ट्विटला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. “धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है, जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है. मी सत्यासाठी… न्यायासाठी… अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्या सारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावत. ” असं चित्रा वाघ म्हणाल्या.