मुंबई : म्हाडाच्या सोडतीमधील ६५० विजेते ठरलेले गेल्या पाच महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. इमारतीला ओसी न मिळाल्यामुळे या घरांचा ताबा रखडला असून विजेते आता घरासाठी म्हाडाकडे विचारणा करू लागले आहेत. म्हाडाने गोरेगाव, मालाड, कुर्ला, पवई, विक्रोळी, अंधेरी येथील २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. या सोडतीत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या १३२७ घरांचादेखील समावेश होता. लॉटरी होऊन पाच महिने उलटून गेले तरी आपल्याला घर कधी मिळणार याकडे ६५० विजेते डोळे लावून बसले आहेत. यात पहाडी गोरेगाव, मालाड पूर्व येथील शिवधाम कॉम्प्लेक्स तसेच खडकपाडा येथील शिवनेरी को.ऑप-हौ. सोसायटी येथील विजेत्यांचा समावेश आहे. याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, निर्माणाधीन इमारतींमधील अंतर्गत कामे काही प्रमाणात शिल्लक आहेत. घरांना ओसी मिळताच विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. लवकरच ओसी मिळणे अपेक्षित आहे.
म्हाडा सोडतीत विजेता ठरवूनही ६५० जण घराच्या प्रतीक्षेत
