Friday, April 25, 2025
Homeदेशराज्यसभेत अमित शाहांचा प्रहार, तामिळनाडूतील हिंदी वादावर विरोधकांना घेरले

राज्यसभेत अमित शाहांचा प्रहार, तामिळनाडूतील हिंदी वादावर विरोधकांना घेरले

नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालयाशी संबंधित अनेक उत्तरे देत विरोधकांवर प्रहार केले. अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यांपासून ते अनेक मुद्द्यांवर विरोधकांना घेरले. इतकंच नव्हे तर तामिळनाडूतील हिंदी मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून स्टॅलिन यांच्यावर जोरदार प्रहार केले.

या वादाबद्दल बोलताना अमित शाह यांनी यावेळी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, की मी घोषणा करतो की डिसेंबरनंतर मी कोणत्याही राज्यातील व्यक्ती असो वा मुख्यमंत्री तसेच खासदार यांच्याशी त्यांच्या भाषेतूनच पत्रव्यवहार करणार. हे भाषेच्या नावावर दुकान चालतात आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी.त्यांच्यासाठी हे मजबूत उत्तर आहे. भारतातील एकएक भाषा ही भारताच्या संस्कृतीचे दागिने आहेत. आम्ही भाषाविरोधी आहोत का? कोणी राज्यांच्या भाषांना का विरोध करेल? आम्हीही तेथूनच येतो.

मी गुजरातमधून येतो तर निर्मलाजी तामिळनाडूच्या आहेत. कसा कोणी भाषांना विरोध करेल. आम्ही भाषांसाठी काम केले आहेत. आम्ही मेडिकल आणि इंजीनियरिंगच्या परीक्षांना भारताच्या भाषांमध्ये अनुवादित केले आहे. मी तामिळनाडू सरकारला चॅलेंज देतो की दोन वर्षांपासून तुमच्यामध्ये हिम्मत नाही की तुम्ही मेडिकल अथवा इंजीनियरिंगची परीक्षा तामिळ भाषेत अनुवादित करू शकलात? कारण त्यात तुमचे आर्थिक हित दडलेले आहे.तुम्ही हे करू शकत नाही. मात्र आमचे सरकार आल्यावर आम्ही मेडिकल आणि इंजीनियरिंगच्या परीक्षा तामिळमध्ये घेऊ.

भाषेच्या नावावर विष पसरवणाऱ्यांना सांगू इच्छितो की हजारो किमीची कोणतीतरी भाषा तुम्हाला जवळची वाटते मात्र आपली भारतीय भाषा चांगली वाटत नाही. तामिळ मुलगा गुजरातमध्येही काम करू शकतो. दिल्लीतही आणि काश्मीरमध्येही काम करू शकतो. कशी देशाची व्यवस्था हवीये. भाषेच्या नावावर तुम्ही जे देशाचे विभाजन करण्याचा विचार करत आहात ते बंद करा. देश प्रगती करत आहे. देश पुढे गेला आहे. तुम्ही विकासाच्या गोष्टी करा. भाषेच्या आड येऊन तुमचे घोटाळे, भ्रष्टाचार लपवू नका…अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -