Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाताय? तर या आहेत स्पेशल रेल्वे

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाताय? तर या आहेत स्पेशल रेल्वे

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्या


मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.


मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ सीएसएमटी-करमळी सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी ते करमाळी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमळीला येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी करमळीवरून दुपारी १.१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील.


गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी १० एप्रिल ते५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता करमळीला पोहोचेल, गाडी क्रमांक ०११३० करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीवरून दुपारी २.३० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल, या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकांवर थांबेल.


या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी ५ एप्रिल ते ३१ मे पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी रात्री १२.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी सुरतकल, मंगळूरु, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनुर, त्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कर, कायम्कुलम आणि कोल्लम येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील.

Comments
Add Comment