

मुंबईतील रस्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार - उदय सामंत
मुंबई: मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प ...
विकासकांकडून नाशिक मंडळाला २० टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र तरीही म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ ही घरे मिळविण्यासाठी सातत्याने नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच २० टक्क्यातील ४९३ घरे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये नाशिक मधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात आली.

मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मुंबई (प्रतिनिधी):मध्य रेल्वेवर रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ...
सर्वसाधारण लॉटरीव्दारे २९१ घरे तर प्रथम येणारयास प्रथम प्राधान्यानुसार २०२ घरे उपलब्ध झाली या घरांची लॉटरी काढण्यात आली. यामध्ये अल्प उत्पन्न गट, तसेच विविध प्रवर्गांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेत मखमलाबाद रोड परिसरातील गृहप्रकल्पांमध्ये १२ ते १८ लाखांपर्यंत वन आणि टू बीएचके घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत तर सातपूर शिवार, पाथर्डी, शिवार, विहीतगाव शिवार यासह गृहप्रकल्पांमध्ये १३ लाखांपासून घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्रयांच्या हस्ते एप्रिल महिन्यात या घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. स्विकृत अर्जाची अंतिम यादी ९ एप्रिल रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. सर्वसाधारण लॉटरीव्दारे उपलब्ध २९१ घरांसाठी ७२७ अर्ज प्राप्त झाले तर प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्यानूसार २०२ घरांसाठी १२० अर्ज प्राप्त झाले. सातपुर येथील म्हाडाच्या ७ घरांसाठी ५१ अर्ज तर येथील आरक्षित प्रवर्गातून २ घरांसाठी ६ अर्ज प्राप्त झाले आहेत.