Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीNavroz 2025 : आज नवरोज...पारशी नववर्षाचा असा आहे इतिहास!

Navroz 2025 : आज नवरोज…पारशी नववर्षाचा असा आहे इतिहास!

पर्शियन भाषेत ‘नवीन दिवस’ ​​(International Nowruz Day) म्हणजे नवरोज. आज पारशी समाज आपले नवीन वर्ष साजरे करत आहे, जो ‘नवरोज’ म्हणून ओळखला जातो. ज्याला मराठीमध्ये पतेती (Pateti 2025) असेही म्हणतात. पारशी धर्मियांसाठी आजचा दिवस महत्वाचाच आणि सण उत्सव या दिवशी साजरा करतात. आज घरोघरी पदार्थ बनवले जातात आणि नवीन कपडे घालून आणि घर सजवून आनंद व्यक्त करतात. हा सण पटेती आणि ‘जमशेदी नवरोज’ म्हणूनही ओळखला जातो.

‘नवरोज’ म्हणजे पारशी दिनदर्शिकेचा पहिला दिवस म्हणजे आजच्या नवीन वर्षाला ‘जमशेदी नवरोज’ म्हटले जाते. कारण पारशी लोकांचे शूर योद्धा आणि पर्शियाचा राजा जमशेद यांनी पहिल्यांदाच आपल्या समाजातील लोकांना पारशी कॅलेंडरबद्दल सांगितले होते. ‘नवरोज’ म्हणजे पारशी दिनदर्शिकेचा पहिला दिवस, ज्याचे संपूर्ण समाज खुल्या मनाने आणि आनंदाने स्वागत करतो. या दिवशी पारशी समाजाचे लोक मंदिरात जाऊन विशेष पूजा करतात आणि अग्नीला आपला साक्षी मानतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात.

Devendra Fadanvis : MPSC परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार – मुख्यमंत्री

समाजातील लोक प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. विशेष म्हणजे या दिवशी हे लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढतात आणि घरात चंदन ठेवतात, असे मानले जाते की असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व वाईट गोष्टी घराबाहेर जातात. लोक एकमेकांच्या घरी जातात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -