Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDisha Salian : दिशा सालियनला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन

Disha Salian : दिशा सालियनला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन

* प्रकरण ‘सीबीआय’कडे तपास सोपवण्याची मागणी

* माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याही चौकशीची मागणी

मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.

दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हीचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या.

दबाव आणला कशाला, न्याय हवा दिशाला

माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेल ला आत्ताच SUBSCRIBE करा

https://www.youtube.com/@PrahaarNewsline

त्या पुढे म्हणाल्या की, दिशाच्या वडिलांनी ही हत्याच असल्याचा संशय व्यक्त करताना, एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही, डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

आम्ही कोणावरही आरोप केलेले नाहीत तर त्या दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केलाय. त्यामागे निश्चित काही कारणं किंवा त्यांची माहिती असेल. आधीची काही पार्श्वभूमी असेल. आमचे एवढेच म्हणणे आहे की त्या दुर्दैवी वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. सीबीआयकडे हे प्रकरण पुन्हा सोपवावे व नव्याने चौकशी करावी, अशी मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी केली.

Navroz 2025 : आज नवरोज…पारशी नववर्षाचा असा आहे इतिहास!

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून त्या तरुणीच्या वडिलांवर दबाव आणला, त्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, सतत खोटी माहिती त्यांना का देण्यात आली, जे पुरावे देण्यात आले तेच खरे आहेत हे त्यांनी मानावं यासाठी त्यांना नजर कैदेत ठेवलं होतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर किशोरी पेडणेकर यांना द्यावी लागतील, असे त्या म्हणाल्या.

पोलीस तपास पूर्ण करण्यासाठी नव्हे तर कोणाला तरी वाचवण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी काम करतायेत असा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेत केला आहे. योग्य पद्धतीने फॉरेन्सिक तपास करण्यात आला नाही, घाईघाईत हे प्रकरण आत्महत्या आहे असं सांगून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हे तर पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा बोगस तयार करण्यात आला त्याच्यामध्ये वैद्यकीय पुरावे नष्ट करण्यात आले, हे सगळे आरोप या याचिकेत नोंदवण्यात आले आहेत. हे सत्य असतील तर ही सगळी अतिशय गंभीर परिस्थिती आहे. पोलिसांच्या भूमिकेवर यात खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अर्थात, त्यासाठी त्यांच्यावर तितक्याच मोठ्या व्यक्तीचा दबाव असणार, त्याशिवाय असं कोणी करू धजणार नाही, अशी शंका आमदार डॉ. कायंदे यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -