मुंबई : जगातील सर्वात उंच पुतळा असा लौकिक असणाऱा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह शेकडो पुतळे घडवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण २०२४ (Maharshtra bhushan) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण २०२४ पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम सुतार यांचं वय १०० वर्ष आहे, आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
राम सुतार यांचा जन्म इ.स.१९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या ४० वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
The veteran sculptor, Ram Sutar ji has been unanimously selected for Maharashtra’s highest civilian award, the ‘Maharashtra Bhushan 2024’.
महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘महाराष्ट्र भूषण 2024’ साठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार जी यांच्या नावास सर्वानुमते मान्यता…… pic.twitter.com/8Sbes3WH4O— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 20, 2025
बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा
राम सुतार यांनी १९४७ साली बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा बनवला. आपल्याच शाळेसाठी १९४८ साली महात्मा गांधीजींचा पुतळा बनवला. आणि इथूनच त्यांचा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला. १९५२ मध्ये त्यांचे प्रमिलाशी लग्न झाले आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार (१९५७ मध्ये जन्म) देखील एक शिल्पकार आहे आणि त्याने त्यांच्या वडिलांसोबत पुतळ्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला भारतातील रॉकेट प्रक्षेपण स्थळावर एक मूर्ती बनवायची आहे, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते. अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही त्यांच्याकडेच आहे. जोशी सरांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेण्याविषयी सुचविले, शिवाय त्यांची राहण्याची व उदरनिर्वाहाची सोयही करून दिली. त्यांनी सुवर्णपदकही मिळविले.
Disha Salian : दिशा सालियनला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन
१६ पुतळे
राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नानगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा थोर विभूतींचे जवळपास १६ पुतळे बनवले.