Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Mumbai Indians जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरणार !

Mumbai Indians जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरणार !

गोलंदाजीचा प्रमुख धुरा ट्रेंट बोल्ट, दीपक चहरवर


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'एक से बढ़कर एक गोलंदाज आहेत. तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) स्पर्धेतील १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या टप्पात जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजीची प्रमुख घुरा ही ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहरवर असेल. मात्र सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणं हा संघासाठी एक मोठा धक्काच आहे. त्याची उणीव भरून काढण्याचे मोठे चॅलेंज मुंबई इंडियन्स संघासमोर असणार आहे.


यंदाच्या तसेव इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात करण्याआधी मुंबई इंडियन्स संघाचा कणधार हार्दिक पांड्या आणि संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी या जोडीला बुमराहच्या अनुपस्थितीत निर्माण होणारी पोकळी कशी भरून काढणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयवर्धने माने ताफ्यात काय सुरू आहे ते सांगितले आहे. जयवर्धने म्हणाला की, जसप्रीत बुमराह हा सध्या बंगळूरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. त्याच्यात प्रगती दिसत असून तो लवकरात लवकर संघात सामील होईल, अशी आशा ही व्यक्त केली आहे. तो क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणे निश्चितच एक आव्हान असेल.


त्याच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूसाठी एक संधी निर्माण होईल, असे सांगत त्यांनी बुमराहच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी २३ मार्चला चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीनं आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून जसप्रीत बुमराह पहिल्या काही लढतींना मुकणार आहे. तो संघाच्या ताफ्यात येत नाही तोपर्यंत मुंबई इंडियन्स कोणता पर्याय आजमावणार ते पाहण्याजोगे असेल.

Comments
Add Comment