
मुंबई: मुंबई इंडियन्सने(Mumbai Indians) गुरूवारी आपले नवे गाणे जाहीर केले. यात मै नही तो कौन बे यावरून फेमस झालेल्या सृष्टी तावडेने आवाज दिला आहे. तर बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफही यात दिसत आहे. गाण्यामध्ये रोहित शर्माची धांसू एँट्री आहे. या गाण्यातील मुख्य ओळी आहेत, प्ले लाईक मुंबई.
मुंबई इंडियन्स(Mumbai Indians)चा संघ आयपीएल २०२५मध्ये आपला पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात डबल हेडरचा दुसरा सामना असेल. हा सामना एमए चिदम्बरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आयपीएल सुरू होण्याच्या २ दिवस आधी गुरूवारी २० मार्चला मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने आपले अँथम साँग लाँच केले आहे.
Game ho ya life, we 𝑷𝑳𝑨𝒀 𝑳𝑰𝑲𝑬 𝑴𝑼𝑴𝑩𝑨𝑰 🔥💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/UYE3HAJF8N
— Mumbai Indians (@mipaltan) March 20, 2025
पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व
हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा रविवारी होणारा सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने अधिकृतपणे सांगितले की पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार.
रोहितच्या नेतृत्वात मुंबईला ५ वेळा जेतेपद
मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ससोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दोघांनी ५-५ आयपीएलची जेतेपदे मिळवली आहेत. रोहितच्या नेतृत्वा मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०मध्ये जेतेपद मिळवले आहे.