सलामीच्या लढतीमधील पराभवाची मालिका खंडीत करण्याचे ‘एमआय’समोर आव्हान

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, पण स्वत:च्या काही लाजिरवाण्या कामगिरींची पुनरावृत्ती थांबवता आलेली नाही. आगामी हंगामात संघाला हे आव्हान पेलावे लागेल. या मोहिमेत सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी असेल.

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला मुंबई इंडियन्स संघ या वर्षीचा पहिला सामना २३ मार्च रोजी खेळणार आहे. ही लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध असेल. सध्या एमएस धोनी सीएसकेचा कर्णधार नाही, तर रोहित शर्माही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत नाहीय. पण तरीही दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचतो. दरम्यान, २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्स संघाला त्यांच्या सलामी पराभवाचा पायंडा मोडीत काढावा लागेल, जो अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. अशा परिस्थितीत सूर्यालासमोर मोठे आव्हान असणार आहे.

२०१२ पासून एमआयने गमावला पहिला सामना

आयपीएलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच वाईट झाली आहे. २०१२ पासून एमआय संघाला त्यांच्या पहिल्या लढतीत बाजी मारता आलेली नाही. २०२२ मध्ये मुंबईला पहिला विजय मिळवण्यासाठी ९ सामने वाट पहावी लागली. मात्र, एकदा संघ विजयाच्या लयीत आला की, तो थांबण्याचे नाव घेत नाही. हाच विरोधी संघांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.

पहिले दोन सामने ‘घराबाहेर’

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स सुरुवातीचे दोन सामने विरोधी संघाच्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नईमध्ये सीएसकेविरुद्ध होईल. चेपॉक स्टेडियम हा चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे यजमान संघाला मात देणे मुंबईसाठी सोपे नसेल. यानंतर, एमआय २९ मार्च रोजी दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळेल. अखेर, ३१ मार्चला त्यांना आपल्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियममध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. तिथे त्यांची लढत कोलकाता नाइट रायडर्सशी होईल. पहिले दोन सामने जिंकून संघ घरचे मैदान गाजवण्याचा प्रयत्न करेल.

पंड्या, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे तणाव

खरं तर, यावर्षी मुंबईच्या समस्या वाढल्या आहेत. कारण कर्णधार हार्दिक पंड्या एका सामन्याच्या बंदीला सामोरे जात आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मुंबई संघ पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादववर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. तो टी-२० मध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे, पण त्याने आयपीएलमध्ये फार कमी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. २०२३ मध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व करत सामना जिंकला होता. सूर्याने ही विजयी मालिका सुरू ठेवून एमआयच्या सलामी लढतीतील पराभवाचा पायंडा मोडीत काढावा अशी चाहत्यांची इच्छा असेल.
Comments
Add Comment

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार

भारत-न्यूझीलंड मालिकेचा निकाल इंदूरच्या ‘होळकर’वर

शुभमन गिलसाठी प्रतिष्ठेची लढाई, विजयाची परंपरा राखण्याचे आव्हान इंदूर : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२६ वर्षाची

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा