मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा ठरलेल्या आयपीएल स्पर्धेच्या १८ व्या हंगामाला २२ मार्च पासून सुरुवात होत आहे. बहुतांश खेळाडूंनी ताफ्यात एन्ट्री करत कसून सराव सुरु केला आहे.आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माही संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्स संघानं रोहित शर्माच्या संघातील एन्ट्रीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात हिटमॅन स्टायलिश अंदाजात एकदम दाबात संघाच्या ताफ्यात जॉईन झाल्याचे पाहायला मिळते.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल अकाउंटवरून बुधवारी(दि. १९) रोहित शर्माचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात संघात एन्ट्री मारण्याआधी दोन लोक त्याला टार्गेट करण्याचे प्लानिंग करताना दाखवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा लूक एकदम हॉलिवूडमधील हिरोसारखा दिसतो. काळ्या रंगाचा सूट अन् काळा गॉगलसह तो स्टायलिश अंदाजात बॅट हातात घेऊन रुममधून बाहेर पडताना दिसते. त्याचा हा अंदाज एकदम कडक असाच आहे.
Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने विक्रमी पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. मागील हंगामापासून तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून आले. यावेळी चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. पण सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.