Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविद्यार्थ्याचा मृत्यू होताच नवी मुंबई मनसेची इमॅजिका पार्कला धडक

विद्यार्थ्याचा मृत्यू होताच नवी मुंबई मनसेची इमॅजिका पार्कला धडक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : रखरखत्या उन्हात शालेय सहल काढणे अत्यंत चूक आहे. इमॅजिका पार्कने पुरेशी पाण्याची व्यवस्था न करणे तसेच जेवणासाठी चायनीज ठेवणे हे व्यवस्थापनाच्या मूर्खपणाचे लक्षण आहे. अशा अनेक चुका इमॅजिका पार्क व्यवस्थापनाने करूनही आयुष सिंग याच्या पालकांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. याबद्दल ही तीव्र नाराजी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच इमॅजिका पार्कने या पुढे शासन निर्णयानुसार शालेय सहली आयोजित करू नये अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल असा इशाराही मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या किमान १२०० विद्यार्थ्यांना घेवून खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती. यावेळी घणसोली शाळा क्र. ७६ येथील हिंदी माध्यमातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग वय वर्ष १४ या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेला इमॅजिका पार्क व्यवस्थापन, नवी मुंबई मनपाचे प्रशासन जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात न्याय मागण्यासाठी मनसे प्रवक्ते, मनविसे सरचिटणीस, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने इमॅजिका पार्कचे व्यवस्थापक शिवराज नायर यांची भेट घेतली.

इमॅजिका पार्कवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक ठिकाणीच शाळा सहल नेऊ शकतात, असा महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय असताना इमॅजिका पार्क या सहली आयोजित कसे करू शकतात?, असा प्रश्न उपस्थित केला. नफेखोरीसाठी इमॅजिका पार्क लहान मुलांचा जीव धोक्यात का घालते, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. इमॅजिका पार्ककडे झालेल्या घटनेचा अहवाल मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मागवला असता, इमॅजिका पार्क व्यवस्थापनाकडे असा अहवाल उपस्थित नसल्याचे पाहून बघून सर्वांनी राग व्यक्त केला. उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना इमॅजिका पार्कवर गुन्हा दाखल करण्याची विनंती मनसेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे ही सांगण्यात आले.

शिष्टमंडळात नवी मुंबईसह रायगडच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

मनसेच्या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते गजानन काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्ना बनसोडे, मनविसे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, महिला सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार, नवी मुंबई मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, , मनसे कामगार सेना सरचिटणीस अभिषेक दर्गे, माथाडी सेना सरचिटणीस महेश सोगे, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडसकर, मनसे नवी मुंबई विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, भूषण कोळी, अक्षय भोसले, नितीन नाईक, शाम ढमाले, रोहन पाटील, विशाल चव्हाण, सनप्रीत तुर्मेकर, रायगड जिल्हा विद्यार्थिनी अध्यक्ष रुचिता सोनार, मनविसे कर्जत तालुका अध्यक्ष प्रविण राणे, मनविसे खालापूर तालुका अध्यक्ष चेतन चोगले, भारती कांबळे, अनिकेत पाटील, प्रतिक खेडकर, मधुर कोळी, प्रद्युमन हेगडे हे उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -