Friday, October 31, 2025
Happy Diwali

कमावण्याची क्षमता असलेल्या सक्षम महिलांनी पोटगी मागू नये

कमावण्याची क्षमता असलेल्या सक्षम महिलांनी पोटगी मागू नये
नवी दिल्ली:‘सक्षम महिलांनी पतीकडून पोटगी मागू नये, नोकरीचा योग्य अनुभव असलेली सुशिक्षित पत्नी फक्त पतीकडून पोटगी मिळवण्यासाठी बेरोजगार राहू शकत नाही’, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.दरम्यान, उच्च न्यायालयात अंतरिम पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका दाखल करण्यात आली होती. पत्नीने दाखल केलेली ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच कमावण्याची क्षमता असलेल्या सक्षम महिलांनी पोटगी मागू नये, अशी महत्वाची टिप्पणी केली. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर स्पष्टीकारण देखील दिलं. कायदा आळशीपणाला प्रोत्साहन देत नाही आणि कमाईची क्षमता असलेल्या पात्र महिलांनी त्यांच्या पतींकडून अंतरिम पोटगीसाठी दावा देखील करू नये. कायद्याचे उद्दिष्ट हे समानतेचे असून आळशीपणाला प्रोत्साहन देणे नाही, असे स्पष्ट करत,विभक्त पतीकडून अंतरिम पोटगीसाठी महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा