Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये दोन चकमकीत ३० नक्षलवादी ठार

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये दोन चकमकीत ३० नक्षलवादी ठार
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर आणि कांकेर या दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले. बीजापूरमध्ये २६ आणि कांकेरमध्ये ४ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी गुरुवार २० मार्च २०२५ रोज सकाळी सात वाजल्यापासूनच नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईद्वारे सुरक्षा पथकांनी नक्षलवाद्यांना मोठा दणका दिला.



एक चकमक बीजापूर - दंतेवाडा सीमेजवळच्या जंगलात बीजापूरमध्ये तर दुसरी चकमक कांकेरमध्ये झाली. दिवसभरात झालेल्या दोन चकमकींपैकी एका चकमकीत एक जवान हुतात्मा झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनी सुरक्षा पथकांचे त्यांच्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
Comments
Add Comment