Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीGATE 2025 Result : यंदाच्या GATE परीक्षेचा निकाल जाहीर! 'असा' पहा रिझल्ट

GATE 2025 Result : यंदाच्या GATE परीक्षेचा निकाल जाहीर! ‘असा’ पहा रिझल्ट

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IIT-R) ने अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) चा निकाल जाहीर झाला आहे. रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे हा निकाल जाहीर (GATE 2025 result) करण्यात आला आहे. हा निकाल gate2025.iitr.ac.in आणि goaps.iitr.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला असून उमेदवार आता त्यांच्या लॉगिनचा वापर करून तपासू शकणार आहेत.

Realme P3 Ultra : अबब! Realme चे दोन जबरदस्त स्मार्टफोन लाँच

निकाल कसा पहावा?

परीक्षार्थी विद्यार्थ्यांना GOAPS पोर्टल वेबसाइट – gate2025.iitr.ac.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी आयडी किंवा ईमेल पत्ता आणि पासवर्ड यासारख्या आवश्यक क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा. त्यानंतर ‘GATE २०२५ निकाल’ टॅबवर क्लिक करा. GATE चा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्यांना भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करून सेव्ह करावा लागेल.

दरम्यान, उमेदवारांनी GATE २०२५ चा निकाल डाउनलोड करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स विसरले असतील, तर अधिकृत वेबसाइट – gate2025.iitr.ac.in वर विसरलेले क्रेडेन्शियल्स परत मिळवण्यासाठी एक टॅब आहे. उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीने लॉग इन करावे लागेल आणि नोंदणी आयडी परत मिळवावा लागेल.

२०२५ साठी पात्रताधारक GATE कटऑफ उमेदवाराच्या तपशीलांसह आणि मिळालेल्या गुणांसह प्रदान केला जाईल. स्कोअरकार्डमध्ये परीक्षेच्या प्रत्येक विभागात उमेदवाराने मिळवलेले गुण, एकूण गुण आणि अखिल भारतीय रँक (AIR) यांचा समावेश असेल. अर्जदारांनी लक्षात ठेवावे की स्कोअरकार्ड फक्त कटऑफ स्कोअर पूर्ण करणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्यांसाठीच जारी केले जाईल. (GATE 2025 Result)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -