Friday, May 9, 2025

विदेशताज्या घडामोडी

अंतराळातून परतल्यानंतर सुनीता विल्यम्सला होऊ शकतात आरोग्याच्या या समस्या

अंतराळातून परतल्यानंतर सुनीता विल्यम्सला होऊ शकतात आरोग्याच्या या समस्या

मुंबई: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. बुधवारी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. त्यांचे अंतराळ मिशन ५ जून २०२४मध्ये सुरू झाले होते. हे मिशन केवळ ८ दिवसांचे होते. मात्र तांत्रिक समस्येमुळे ते ९ महिने अंतराळात अडकून होते.


अंतराळात इतका दीर्घकाळ घालवल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.जाणून घेऊया अंतराळातून परतल्यानंतर सुनीता विल्यम्सला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.



हाडे आणि मांसपेशीवर परिणाम


सर्वाधिक चिंता आहे ती म्हणजे हाडे आणि मांसपेशी कमकुवत होणे. ISSमध्ये अंतराळवीर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये तरंगत असतात याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. पृथ्वीवर आपले शरीर नेहमी गुरूत्वाकर्षणाच्या विरोधात काम करते यामुळे आपल्या मांसपेशी आणि हाडांचा सतत व्यायाम होत असतो. मात्र अंतराळात असे नसल्याने मांसपेशींची ताकद आणि हांडाची घनता कमी होऊ लागते.



अंतराळवीर दर महिन्याला आपल्या हाडांचा १ टक्के भाग गमावू शकतात. खासकरून कंबर, त्या खालचा भाग यावरील हाडांना त्रास होतो. यामुळे पृथ्वीवर परतल्यानंतर हाडे तुटण्याचा धोका अधिक असतो. हे कमी कऱण्यासाठी अंतराळवीर अंतराळात व्यायामही करतात.


अंतराळात अंतराळवीरांच्या पायांवर जास्त दबाव पडत नाही. यामुळे पायाशी संपर्क झाल्याने निर्माण होणारी कठोर त्वचा मुलायम होते. यामुळे त्यांच्या पायांची त्वचा संवेदनशील होते.


दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने त्यांच्या हृदयावरही परिणाम होतो. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण रक्त, पाणी तसेच इतर द्रव्ये खालच्या दिशेने खेचते. यामुळे शरीरात ते संपूर्णपणे समान पद्धतीने वितरित होते. मात्र मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये गुरुत्वाकर्षण असत नाही यामुळे द्रव पदार्थ वरच्या भागाच्या दिशेने जातात. यामुळे चेहऱ्यावरील सूज, नाक जाम होणे तसेच डोक्यावरील दबाव वाढू शकतो. सोबतच खालचे शरीर कमकुवत आणि बारीक दिसू लागते. खरंतर, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये हृदयाला रक्त पंप करण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागत नाही जितकी पृथ्वीवर घ्यावी लागते. यामुळे हृदयाचा आकार बदलतो.

Comments
Add Comment