Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी

Pune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी

पुणे : पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीसाठी अनेक तरुणी – तरुणींनी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेवेळी लांबच लांब उमेदवारांची रांग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक तरुणी जखमी झाल्या. अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली.

Nagpur News : नागपुरातील दंगली दरम्यान महिला पोलीस कर्मचारीसोबत घडला धक्कादायक प्रकार

पुण्यात बुधवार १९ मार्च २०२५ रोजी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात ‘पुणे कारागृह महिला पोलीस’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. या भरतीसाठी तीन हजार तरुणींनी गर्दी केली होती. पहाटेपासून तरुणी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात आल्या होत्या. भरती प्रक्रिया सुरू व्हायला वेळ होता म्हणून प्रवेशद्वार अर्थात गेट बंद ठेवण्यात आले होते. पण मुलींची गर्दी झाली. गेट उघडल्यावर पटकन आत जाऊन भरतीसाठी पहिला क्रमांक लावायचा या हेतूने तरुणींमध्ये धक्काबुक्की झाली. रेटारेटीचा ताण पडला आणि मैदानाचे गेट तुटले. गेट तुटल्यामुळे उघडले आणि मुलींनी एकदम मैदानाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक तरुणी जखमी झाल्या. चेंगराचेंगरी झाल्यामुळें अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली.

‘पुणे कारागृह महिला पोलीस’ भरती २०२२ – २३ पासून रखडली आहे. एकूण ५१३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली. पण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कारणामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत होता. यामुळे बुधवारी संधी मिळवण्याच्या धडपडीत तरुणींची गेटजवळ धक्काबुक्की झाली. यातून पुढे चेंगराचेंगरी झाली. पोलीस प्रशासनाच्या नियोजनात ढिसाळपणा होता. यामुळेच चेंगराचेंगरी झाली, असा आरोप चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या महिला पोलिसांच्या कुटुंबियांनी केला. तर चेंगराचेंगरी झालेली नाही पण किरकोळ स्वरुपाची धक्काबुक्की, रेटारेटी झाली; असे पोलिसासांनी सांगितले.

भरतीसाठी आलेल्या अनेक तरुणींसोबत त्यांचे पालक आल्यामुळे गर्दी झाली होती. गेटजवळ थोडी धक्काबुक्की, रेटारेटी झाली. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस प्रशासनाने लांबून आलेल्या तरुणी आणि त्यांच्या पालकांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेचा उपयोग तरुणी आणि त्यांचे पालक घेऊ शकतील, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -