
राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र गुजरात टायटन्सने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. तर २०२४ मध्येही संघाने दमदार सुरुवात केली, पण शेवटच्या टप्प्यात अपयश पदरात आले. यंदा संघाने आपल्या चुका सुधारून अंतिम टप्प्यात अधिक मजबुतीने खेळण्याचा निर्धार केला आहे.
राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवत नव्या हंगामासाठी संघ अधिक मजबूत केला आहे. संघात यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर यांसारखे फलंदाज आहेत, तर जोफ्रा आर्चर, महीश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश गोलंदाजीला धारदार बनवतो.
राहुल द्रविडचे लाभणार मार्गदर्शन
गेल्या हंगामात राजस्थानने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. आता संघ पुन्हा नव्या जोशात उतरून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाला चांगली रणनीती आणि युवा खेळाडूंना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्सचे संभाव्य शिलेदार
संजू सॅमसन (कर्णधार)
यशस्वी जैस्वाल
रियान पराग
नितीश राणा
ध्रुव जुरेल
शिमरॉन हेटमायर
संदीप शर्मा
जोफ्रा आर्चर
महीश तीक्ष्णा
वानिंदू हसरंगा
फजलहक फारूकी