Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNASA Astronauts Sunita Williams : ...म्हणून मोदी म्हणाले पृथ्वीला तुमची आठवण आली

NASA Astronauts Sunita Williams : …म्हणून मोदी म्हणाले पृथ्वीला तुमची आठवण आली

मुंबई : संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (NASA Astronauts) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्ब्ल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. या क्षणाचे भारतवासीयांनीच नाही तर पंतप्रधानांनीही कौतुक केले आहे.

सुनीता विल्यम्स ९ महिन्यांनंतर आज अवकाशातून पृथ्वीवर परतणार

नासाच्या अंतराळवीर (NASA Astronauts) सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले विल्यम्स व विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. याचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान मोदींनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांची सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुकाने पाठ थोपटली आहे. वेलकम बॅक crew ९ या पृथ्वीला तुमची आठवण येत होती. असे मोदी म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

#Crew9, तुमचं स्वागत आहे! पृथ्वीला तुमची आठवण येत होती. Crew9च्या टीमसाठी धैर्य, धाडस आणि अमर्याद मानवी आत्म्याची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि #Crew9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अज्ञातासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल. अवकाश संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. सुनीता विल्यम्सने तिच्या कारकिर्दीत याचे उत्तम उदाहरण जगाला दिले आहे. त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचा आम्हाला अविश्वसनीय अभिमान आहे. जेव्हा अचूकता उत्कटतेला आणि तंत्रज्ञान दृढतेला भेटते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -