मुंबई: रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अनेकदा लोकांना रेल्वेच्या डब्यात जागेची समस्या सतावते. खासकरून सणांच्या वेळेस रेल्वेंमध्ये तुफान गर्दी असते. यूपी-बिहारला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तर गर्दीची सोयच नसते. यामुळे रेल्वेची तिकीटेही मिळणे मुश्किल असते. अशातच भारतीय रेल्वे एक नवा बदल करत आहे. रेल्वे आता प्रवाशांना केवळ कन्फर्म तिकीटच देणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वेशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली. रेल्वे मंत्री म्हणाले, रेल्वेंमधील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेता सीटच्या हिशेबाने तिकीट जारी केले जातील. म्हणजेच जितक्या सीट्स असतील तितकीच तिकीटे विकली जातील. यामुळे रेल्वेतील कन्फर्म सीटसोबत प्रवास करणाऱ्यांना वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांचा त्रास होणार नाही.
विना तिकीट प्रवास केल्यास इतका दंड
जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करत असताना पकडले गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागले. जर तुमच्याकडे पैसे नाहीत अथवा तुम्ही दंड भरायला नकार दिलात तर तुम्हाला आरपीएफकडे सोपवले जाईल. सोबच रेल्वे अधिनियमच्या कलम १३७ अंतर्गत केस दाखल केली जाईल. आरपीएफ या प्रवाशांना रजिस्टारसमोर सादर करेल. अशातच त्यांना एक हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते.
सुरक्षिततेवर भर
अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की रेल्वेचा सुरक्षेवर अधिक भर असणार आहे. त्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आलेले आहेत. यात लाँगर रेल, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाईस तसेच अनेक गोष्टींचा समावेश आहे.