Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीGoogle Doodle : चंद्रकलेचा खेळ खेळायला गूगलवर गर्दी

Google Doodle : चंद्रकलेचा खेळ खेळायला गूगलवर गर्दी

मुंबई : गूगल डूडल ही गूगल कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. सर्च इंजिनच्या मुख्य पानावर जिथे मोठ्या अक्षरात गूगल (GOOGLE) हा शब्द आहे तिथे आकर्षक चित्र, व्हिडीओ, गेम याची मांडणी करुन त्याच्या मदतीने गूगल हा शब्द सजवून सादर करण्यासाठी कंपनी स्पर्धेचे आयोजन करते. इंटरनेट वापरणाऱ्या हजारो नागरिकांकडून नियमितपणे या स्पर्धेत भाग घेतला जातो. स्पर्धेतील विजेत्यांनी साकारलेले डूडल काही वेळा वापरले जातात. तर काही वेळा कंपनी त्यांच्या रचनाकारांच्या मदतीने गूगल हा शब्द सजवून आकर्षक डूडल तयार करते. यावेळी चंद्रकला अर्थात चंद्राच्या दररोज बदलणाऱ्या स्थितीवरुन एका गेमची निर्मिती करण्यात आली आहे.

गूगल हा शब्द सर्च इंजिनच्या मुख्य पानावर जिथे आहे तिथेच गेमकडे लक्ष वेधले जाईल असे आकर्षक चित्र आहे. हे चित्र गेमशी संबंधित आहे. सर्च इंजिनच्या मुख्य पानावरील गूगल शब्दावर क्लिक करताच गेमचे पेज उघडते. हा एक निव्वळ मनोरंजनासाठी तयार केलेला विनामूल्य कार्ड गेम आहे. गूगलवर क्लिक करताच इंटरनेट वापरकर्ता थेट गेमपर्यंत पोहोचतो.

गेममध्ये खेळाडूंच्या चंद्रचक्राच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाते. गेममध्ये, वापरकर्त्यांना चंद्राशी स्पर्धा करावी लागते, जिथे त्यांना वेगवेगळ्या चंद्र चरणांशी जुळवून गुण मिळवावे लागतात. जर खेळाडूंनी चंद्राला हरवले तर त्यांना विशेष बक्षिसे मिळतात. खेळाडूंना वेगवेगळे स्तर पार करावे लागतात आणि चार नवीन वाइल्ड कार्ड अनलॉक करण्याची संधी मिळते. हे आव्हान पूर्ण करणारे खेळाडू त्यांचे उच्च स्कोअर शेअर करू शकतात आणि त्यांच्या चंद्रचक्राच्या ज्ञानाची त्यांच्या मित्रांशी तुलना करू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -