Friday, May 9, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Sunita Williams: तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतली अंतराळवीर सुनीता विल्यम्स, पाहा Video

Sunita Williams: तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतली अंतराळवीर सुनीता विल्यम्स, पाहा Video
मुंबई: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. यानंतर कॅप्सूलमधून काढून खास पोतमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले.

दोघेही भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर सुरक्षित लँड झाले. ९ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्यांचे पृथ्वीवर परणे हे ऐतिहासिक आहे.


सुनीता विल्यम्स ९ महिन्यांनंतर पृ्थ्वीवर परतल्याची बातमी ऐकताच गुजरातमधील तिच्या गावात एकच जल्लोष करण्यात आला.

 



सुनीता विल्यम्सच्या परतण्याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की , गौरव, गर्व आणि दिलासाचा क्षण! संपूर्ण जग या भारताच्या मुलीच्या सुरक्षित परतण्याबद्दल जल्लोष करण्यासाठी एकत्र आले आहे. अंतराळातील अनिश्चितता सहन कऱण्याचे साहस, दृढ विश्वास आणि स्थिरता याची इतिहासात नोंद होईल.

 

Comments
Add Comment