Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीया कंपनीने लाँच केला खास प्लान, ७५० रूपयांत मिळणार ६ महिन्यांची सर्व्हिस

या कंपनीने लाँच केला खास प्लान, ७५० रूपयांत मिळणार ६ महिन्यांची सर्व्हिस

मुंबई: BSNLच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनीने नुकताच एक नवा प्लान सादर केला आहे. हा परवडणारा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी आणि दुसऱ्या सर्व्हिस मिळतात. आम्ही बोलत आहोत BSNLच्या ७५० रूपयांच्या नव्या प्लानबद्दल…

हा प्लान ६ महिन्यांची व्हॅलिडिटी म्हणजेच १८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात. ७५० रूपयांच्या बीएसएनएलच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यात तुम्हाला दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदे मिळतात.

सोबतच कंपनी तुम्हाला दररोज १०० एसएमएस देते. यात दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला असा प्लान मिळणार नाही. दरम्यान, BSNLचा हा प्लान सर्व युजर्ससाठी नाही. या प्लानचा फायदा केवळ GP-2 ग्राहकांना मिळणार आहे. आता सवाल असा आहे की हे ग्राहक कोण?

असे ग्राहक यांनी आपले कनेक्शन ७ दिवसांपेक्षा अधिक काळ रिचार्ज केलेले नाही त्यांना GP-2 ग्राहक म्हटले जाते. यासाठीची आणखी एक अट आहे ती म्हणजे ७ दिवसांपर्यंत रिचार्ज न केल्यानंतर १६५ दिवसांपर्यंत ते GP-2 ग्राहक बनतात. असे युजर्स ७५० रूपयांचा प्लान वापरू शकतात.

हा प्लान एक स्वस्त पर्याय आहे. यात तुम्हाला कमी किंमतीत दीर्घ व्हॅलिडिटीसोबत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -