Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाआयपीएलची आजपासून ऑनलाईन तिकीटविक्री

आयपीएलची आजपासून ऑनलाईन तिकीटविक्री

मुंबई :इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १८ वा हंगाम असून त्यासाठी सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांनाच प्रतिक्षा असणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) खेळवला जाणार आहे. दरम्यान, आता बऱ्याच ठिकाणच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. चेन्नईमध्ये जाऊन स्टेडियममधून ज्यांना या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी १९ मार्च २०२५ पासून ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी १०.१५ वाजल्यापासून www.chennaisuperkings.com यावर तिकीट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या वेबसाईटवर साईन अप करून त्यांच्या क्विज कॉन्टेस्टमध्ये जिंकून तिकीट मिळवण्याचीही संधी चाहत्यांना आहे. १७००, २५००, ३५००, ४००० आणि ७५०० अशा किंमतीची तिकीटे उपलब्ध असणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -