
वॉशिग्टन (वृत्तसंस्था): सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर,एक अमेरिकन आणि एक रशियन अंतराळवीर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानावर उतरू शकतात. यापूर्वी ते बुधवारी पृथ्वीवर परततील असे वृत्त होते, अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'ने दिली आहे.
स्पेसएक्सचे ड्रॅगन क्राफ्ट अंतराळयान शनिवारी, १५ मार्चला चार अंतराळवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून दोघेही अंतराळात पोहोचले होते; परंतु स्टारलाइनर अंतराळयानात तांत्रिक बिघाडामुळे दोघेही परत येऊ शकले नव्हते.
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दीर्घ मुक्कामानंतर अखेर पृथ्वीवर परतत आहेत. ते दोघेही गेल्या वर्षी जूनपासून आयएसएसवर होते, बोईंग स्टारलाइनर या अवकाशयानाची चाचणी घेण्यासाठी ते अवकाशात होते. हे अंतराळ यान काही दोषांमुळे खराब झाले आणि ते पृथ्वीवर परत येऊ शकले नाही.
या रविवारी क्रू ड्रॅगन अंतराळयान बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स, आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एक रशियन अंतराळवीर यांना घरी घेऊन येण्यासाठी अंतराळात पोहोचले आहे. बोईंगच्या पहिल्या अंतराळवीर उड्डाणातील अंतराळवीरांना वेळापत्रकानुसार आठवडाभरात परतायचे होते, परंतु या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी आयएसएसमध्ये नऊ महिने पूर्ण केले.