गाझा : इस्रायलने गाझामध्ये महिन्याभराच्या शांततेनंतर पुन्हा एकदा हल्ले सुरु केले आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलांच्या माहितीनुसार हवाई दल गाझामधील हमासच्या तळांवर हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २३२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेन युद्ध समाप्तीसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्याचवेळी गाझामध्ये पुन्हा हे हल्ले झाले आहेत. युक्रेन आणि गाजा पट्टीतील युद्ध रोखणं हे ट्रम्प यांचे निवडणुकीतील मुद्दे होते. इस्रायलने पुन्हा हल्ले केले, त्यावरुन असं दिसतय की, ट्रम्प मध्य पूर्वेच्या शांततेसाठी गंभीर नाहीयत. मागच्या १५ महिन्यापासून गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये लढाई सुरु होती.
गाझामध्ये विस्थापित झालेले लोक घर आणि तंबूमध्ये रहात आहेत. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात २०० लोक मारले गेले आहेत. अनेक जण जखमी झालेत. ज्या केंद्रीय क्षेत्रात आम्ही आहोत, तिथल्या आकाशात कमी उंचीवरुन ड्रोन्स आणि फायटर विमानं आम्हाला उड्डाण करताना दिसली. इस्रायलच्या या कारवाईमुळे पॅलेस्टिनी नागरिक भेदरले आहेत. युद्ध विराम कायमस्वरुपी रहावा अशी गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींची इच्छा आहे.
इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, ते हल्ल्याची योजना आखणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत होते. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायलने गाझाला अन्न, औषध, इंधन आणि इतर साहित्याचा पुरवठा रोखला आहे आणि हमासने युद्धबंदी करारातील बदल स्वीकारावेत अशी मागणी केली आहे.
أكثر من 35 غارة جوية إسرائيلية على غزة خلال النصف ساعة الأخيرة، وطواقم الإسعاف والدفاع المدني تواجه صعوبة في إخلاء الشهداء والجرحى. pic.twitter.com/gCRH0kW9Je
— أنس الشريف Anas Al-Sharif (@AnasAlSharif0) March 18, 2025
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, युद्धबंदीच्या चर्चा प्रगतीपथावर नसल्याने हल्ल्यांचे आदेश दिले. नेतन्याहू यांनी अनेक वेळा पुन्हा युद्ध सुरू करण्याची धमकी दिली आहे. त्याच वेळी, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इशारा दिला आहे की जर ओलिसांना सोडले नाही तर गाझामध्ये नरकाचे दरवाजे उघडले जातील.
अवघ्या अर्ध्या तासात इस्रायली सैन्याने ३५ पेक्षा जास्त एअर स्ट्राइक केले अशी अनस अल शरीफने एक्सवर माहिती दिली. बचाव पथकं आणि रुग्णवाहिकेला लोकांना वाचवण्यासाठी बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागला.