Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : संध्याकाळी ठरवून दंगल झाली ? एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला...

Eknath Shinde : संध्याकाळी ठरवून दंगल झाली ? एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी चिटणीस पार्क आणि महाल भागात हिंसा आणि जाळपोळ झाली. विशिष्ट समाजाला लक्ष्य करुन हल्ले सुरू होते. पोलिसांवरही दंगलखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले.

नागपूरमध्ये कशी झाली दंगल, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

‘आधी नागपूरमध्ये आंदोलन झाले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. आंदोलक शांततेने निघून गेले. नंतर संध्याकाळी आठ वाजता एक दुसराच गट रस्त्यावर आला. थोड्याच वेळात सुमारे पाच हजारांचा जमाव रस्त्यावर आला होता. महाल परिसर, मोमिनपुरा, हंसापुरी या भागात जमाव रस्त्यावर होता. मी टीव्हीवर महिलांच्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. घरामध्ये मोठे- मोठे दगड टाकले. पाच वर्षाचा बच्चू मरता मरता वाचला, हॉस्पिटलमध्ये असलेले देवांचे फोटो जाळले… तुम्ही आंदोलन करा पण लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, कायदा हातात घेत विशिष्ट समुदयाला लक्ष्य करता… संध्याकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये तीन डीसीपी जखमी झाले. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने वार झाला. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. कार आणि दुचाकी पेटवण्यात आल्या. एका विशिष्ट ठिकाणी रोज १०० ते १५० गाड्या पार्क व्हायच्या तिथे एकही गाडी नव्हती, अशी मला मिळालेली माहिती आहे. याचा अर्थ जाणीवपूर्व हे षडयंत्र करत विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केला.

Nagpur Violence Update : नागपूरच्या अनेक भागात संचारबंदी!

दंगल करणाऱ्यांनी पोलीस येईपर्यंत धुमाकूळ घातला. पोलीस आल्यावर त्यांच्यावरही हल्ला केला. पोलिसांवर दगडफेक केली. पेट्रोल बॉम्ब टाकले. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं सरकार आहे. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दंगल करणाऱ्यांवर सरकार कायद्यानुसार कठोर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -