ठाणे : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत २१ ते २४ वर्ष वयोगटातील तरूणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून खालील विविध क्षेत्रातील कंपन्यामध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.३१ मार्च २०२५ असून अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
या योजनेंतर्गत युवकांना १२ महिन्यासाठी इंटर्नशिप मिळेल. तसेच या सोबतच त्यांना दरमहा ५ हजार रूपये अनुदान मिळतील. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार रूपये एक रकमी अनुदान दिले जाईल. तसेच या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते.
तरी इच्छुक उमेदवारांनी या इंटर्नशिप संधीसाठी https://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे यांनी केले आहे.
कंपनींची नावे – ACC LIMITED, ADANI HARBOUR SERVICE LTD, ADANI TRANSMISSION (INDIA) LTD, ASHOKA BUILDCON LTD, BAJAJ ALLIANZ GEN INSHURANCE CO. LTD., BAJAJ FINANCE LTD, BANDHAN BANK LTD, BENNETT COLEMAN & CO. LTD., BERGER PAINTS INDIA LTD, GHARDA CHEMICALS LTD., GLENMARK PHARMACEUTICALS LTD., HDFC BANK LTD, HINDUSTAN PETROLEUM CORP. LTD., ICICI BANK LTD., INDIAN OIL CORP. LTD., INDUSIND BANK LTD, JUBILANT FOODWORKS LTD., KOTAK MAHINDRA BANK LTD, KOTAK SECURITIES LTD., SHRIRAM FINANCE LTD., SHRIRAM GEN.INSURANCE CO. LTD., TATA CAPITAL LTD., TATA CONSULTANCY SERVICE LTD., TATA CONSUMER PRODUCTS LTD., TORRENT POWER LTD., ULTRATECH CEMENT LTD., VOLTAS LTD., MACROTECH DEVELOPERS LTD., POWER GRID CORPORATION OF INDIA LTD., RBL BANK LTD., RELIANCE INDUSTRIES LTD.