

Shiv Sena : शिवसेनेचे ऑपरेशन टायगर जोरात, उद्धव गटाला कोकण आणि छत्रपती संभाजीनगरात पुन्हा खिंडार
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने ऑपरेशन टायगर जोरात सुरू केले आहे. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांच्या ...
दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल,असे निरीक्षण नोंदवले होते. न्यायालयाने नोंदवलेल्या या निरीक्षणावर आक्षेप घेऊन माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या आणि प्रकरणातील मूळ तक्रारदार अंजली राठोड यांनी नाशिक सत्र न्यायालयाने ५ मार्च रोजी दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

MLC By Poll : विधान परिषदेत उरली महायुतीच्या विजयाची औपचारिकता
मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयाची औपचारिक घोषणा २० तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल. ...
न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या एकल खंडपीठासमोर ही याचिका मंगळवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, अंजली राठोड या प्रकरणात तक्रारदार नसल्याने ही याचिका करण्याचा त्यांना अधिकर नाही. तसेच, त्यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही,असे कोकाटे यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तर, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र या टप्प्यावर सत्र न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आणि राज्य सरकारसह कोकाटे बंधूंना नोटीस बजावून प्रकरण २१ एप्रिल रोजी ठेवले.