मुंबई: चिया सीड्सला एक सुपरफूड म्हटले जाते. वजन कमी करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. चिया सीड्स खूप लहान काळे दाणे असतात जे पाण्यात टाकल्यावर काही वेळाने फुगतात. चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात जे वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात.
आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही चिया सीड्ससोबत खाल्ले पाहिजे. चिया सीड्ससोबत खाल्ल्याने पोषकतत्वे बॅलन्स होतात.
चिया सीड्स आणि दही – दही प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला सोर्स मानला जातो. चिया सीड्ससोब दह्याचे सेवन परफेक्ट मानले जाते. दह्यामध्ये चिया सीड्स मिसळून खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
चिया सीड्स आणि ओट्स – ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. सोबतच यात कार्बोहायड्रेट्स असते यामुळे वारंवार लागणाऱ्या भुकेपासून वाचता येते.
चिया सीड्स आणि नारळपाणी- नारळपाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाईट असते जे तुम्हाला हायड्रेट ठेवायला तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. नारळपाण्यामध्या चिया सीड्स मिसळून खाल्ल्याने रिफ्रेशिंग वाटते.
चिया सीड्स आणि फ्रुट्स- फ्रेश फ्रुट्समध्ये फायबर, व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. फ्रुट्समध्ये चिया सीड्स मिसळून खाल्ल्याने पौष्टिक स्नॅक्स तयार होते. यामुळे खाण्याचे क्रेव्हिंग्सही कमी होतात.