
मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपा पाठोपाठ शिवसेनेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly 2025) विजय मिळाल्यामुळे ५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. या पाच जागंसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती. अखंड विश्वाचा आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं ...
मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. आज या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रघुवंशी हे अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणूकीसाठी भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी कोणाला संधी मिळणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?
चंद्रकांत रघुवंशी हे धुळे-नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. ते १९९२ पासून राजकारणात आहेत. ते सहा वर्षे धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते सलग तीनवेळा विधानपरिषदेत निवडून गेले होते. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटात सामील झाले होते. आता त्यांना विधानपरिषदेची उमेद्वारी मिळाली आहे.