Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजOrry : वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पवर दारू पिणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

Orry : वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पवर दारू पिणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

श्रीनगर : बॉलिवूड स्टारकीड्ससोबतच्या फोटोंमध्ये सतत सोबत दिसणारा आणि विचित्र पोज देणारा ओरहान अवत्रामणी ऊर्फ ओरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह आणखी ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कँपवर मद्यप्राशन करताना त्यांना पकडण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ओरी आणि त्याचे ७ मित्र माता वैष्णोदेवी बेस कँप येथील कटरा या भागातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये काही रशियन नागरिकही आहेत. ओरी, दर्शन सिंह, पार्थ रैना, ऋत्विक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि रशियन नागरिकांची नावं समोर आली आहेत. वैष्णोदेवी मंदिर परिसरात आणि काही अंतरापर्यंत मांसाहारी अन्न आणि दारुचं सेवन करण्यास बंदी आहे.

Onion Export : कांद्यावरील २०% निर्यात शुल्क हटवणार?

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि स्थानिक नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर(FIR) दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची विशेष टीम बनवण्यात आली आहे. एसएसपी परमवीर सिंह यांनी या ८ जणांविरोधात सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. धार्मिक स्थळाचं पावित्र्य भंग केल्याप्रकरणी ओरीविरोधात आता पोलिस आक्रमक झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -