Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' सिनेमाचा टीझर पाहून नेटकरी नाराज

सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' सिनेमाचा टीझर पाहून नेटकरी नाराज

मुंबई: बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता लवकरच मराठी सिनेसृष्टीतील 'झापूक झुपूक' या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून या चित्रपटाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून मात्र नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' हा चित्रपट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या प्रोमो टीझरमध्ये सुरुवातीला कोणाच्या तरी लग्नाची वाजत गाजत वरात दिसत आहे. सूरज चव्हाण या वरातमीध्ये नाचताना दिसत आहे. त्यानंतर तो चिडलेला दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक'सिनेमाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने, 'केदार शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'फक्त छपरी पोरं हा सिनेमा पाहायला जाणार' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका यूजरने हा चित्रपट 300 ते 400 कोटी रुपये कमावणार अशी भविष्यवाणी केली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात एक धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment