Sunday, April 20, 2025
Homeमहत्वाची बातमीएप्रिल, मे महिन्यांत मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

एप्रिल, मे महिन्यांत मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

सातही धरणांमध्ये उरला ४२ टक्के पाणी साठा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ४२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीला उन्हाने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात देखील होत आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणाची क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.

धरणातील पाणी साठा

मोडक सागर धरण पाणी साठवण क्षमता १लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा २९ हजार २०१ दशलक्ष लीटर
तानसा धरण पाणी साठवण क्षमता १लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४६ टक्के
भातसा धरण पाणी साठवण क्षमता ७लाख १७ हजार ३७ दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४२ टक्के
मध्य वैतरणा धरण पाणी साठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४६ टक्के
अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी धरण
शिल्लक पाणी साठा ५० ते ५५ टक्के

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -