
d
आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करू शकतो. याचे एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचे दर्शन घेऊ शकतो; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Ladaki Bahin : 'लाडकी बहीण'मध्ये बदल होणार पण योजना बंद नाही होणार'
मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. सध्या या योजमेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेत थोडा बदल ...
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी बांधण्यात आली आहे. अतिशय चांगला बुरुज आहे. दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे. बगिच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पहायला मिळतात; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Gold smuggling : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलं ८.४७ कोटी रुपयांचं सोनं
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी चार प्रकरणांमध्ये मिळून एकूण १०.९२३ किलो वजनाचं सोनं पकडलं. ...
'ज्या काळात या देशातील राजे, रजवाडे मुगलांची, परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा निर्माण झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी, या परकियांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी शिवाजी महाराज लढले. आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले;' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत?. प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती ? त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होतं. पण ते युगपुरुष होते. त्यांना असुरी शक्ती विरोधात लढू शकतो हा आत्मविश्वास समाजात निर्माण करायचा होता. समाज घडवायचा होता. यासाठीच त्यांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तींना एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच बळावर जगातील मोठ्या अधर्मी शक्तीचा नि:पात केला. रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण केला. म्हणून एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम युगपुरुष आहेत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र केलं. शेतकरी, अलुतेदार - बलुतेदार यांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केलं. देव, देश, धर्मकारिता लढण्यासाठी विचारांचं बीजारोपण केलं. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायचं नाहीय तर देव, देश धर्माकरता लढायचं आहे हा विचार रुजवला. यातून शिवरायांनी असे मावळे घडवले ज्यांनी खानाच्या फौजांशी लढाई केली. खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना पराभूत करायचे, पळवून लावायचे. हे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेतून घडले. पुढे मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. याच कारणासाठी कौतुक करायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे करायचे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.