महाड : ऐतिहासिक तळे म्हणून ओळख महाड शहरातील या हापूस तळ्याची ओळख आहे. महाड शहरातील विविध भागात अनेक प्राचीन तळी आहेत. त्यातील चवदार तळे जागतीक नकाशावर आहे. गांधारीनाका परिसरात महाड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हापूस तळे आहे. इतिहास काळात महाड हे बंदर होते व येथून मोठ्या प्रमाणात धान्ये व वस्तूंची उलाढाल होत असे. त्याकाळी रस्ते, पूल या सुविधा नव्हत्या. तेव्हा होडीनेच सामानाची वाहतूक होत असे. या होड्यांवर हबशी म्हणून काम करणारे या ठिकाणी पाण्याची सोय असल्याने मुक्कामाला उतरत असत. काम संपल्यावर माघारी जात त्यामुळे या तळ्याला हाबूस व नंतर हापूस तळे असे नाव पडल्याचे जूने जाणकार सांगतात.
Gokhale Bridge : गोखले पूल मे मध्ये सुरू होणार; पूल विभागाची माहिती
हे तळे बुजलेले होते. तर आतमध्ये रानटी वनस्पतीही उगवलेल्या होत्या. परिसरातील इमारतींचे सांडपाणीही या तळ्यात जात होते. असे हे तळे अनेक वर्षे दुर्लक्षित होते. आता या तळ्याचा विकास नगर पालिकेने हाती घेतला आहे. तळ्यातील गाळ काढून उत्पाद देखील तयार करण्यात आला, परंतु यानंतर मात्र महाडमध्ये २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साठला होता, तर फुटपाथ काम देखील खराब झाले, परंतु आता पुन्हा सध्या तळे साफ करण्याचे काम सुरू आहे. तळ्याचे खोदकाम केले जाणार असून गॅब्रियन वॅाल बांधल्या जाणार आहेत. तळ्याच्या भोवती सुमारे पाचशे मीटरच्या लांब व साडेचार फूट रुंद ट्रॅक राहणार आहे, भोवताली बाग, स्वच्छतागृह, पायऱ्या व बाजूने सांडपाणी झिरपू नये यासाठी गटारांची सुविधा केली जाणार आहे.