
d
अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी तुलसी गबार्ड यांच्याशी झालेल्या भेटीत खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसच्या भारतविरोधी कारवायांचा मुद्दा उपस्थित केला आणि या संघटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानविरोधात लढाईत निर्वासित बलुचिस्तानने मागितली भारताकडे मदत
बलूच : बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर आक्रमक हल्ले सुरूच ठेवले आहेत. ट्रेन हायजॅकपासून स्फोटापर्यंत बलूचिस्ताननं पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली आहे. ...
तुलसी गबार्ड यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या नेतृत्वाखालील एसएफआयबद्दल भारताची चिंता व्यक्त केली आणि अमेरिकेला या संघटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. ही बैठक अशा वेळी झाली आहे,जेव्हा अमेरिकन वकिलांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावला होता.पण,भारताने पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नात भारताची भूमिका नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे आणि तो दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात वॉन्टेड गुन्हेगार आहे. त्याला दहशतवादविरोधी कठोर कायदा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना निकष बदलून सुरू ठेवणार
मुंबई (प्रतिनिधी): गेल्या १० वर्षांत राज्याचा अर्थसंकल्प हा महसुली आणि राजकोषीय तुटीचा म्हणूनचा सादर झालेला आहे.तरीही महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ...