पुणे : औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांचा निषेधासाठी पुण्यात पतित पावन संघटनेने आंदोलन केले पण या आंदोलनादरम्यान मोठी चूक झाली.आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घातला आणि फोटोही जाळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची आता शहरात चर्चा रंगली आहे. मात्र संघटनेकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहील बंद
या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी संघटनेच्या चुकीवर टीका केली आहे. इतिहासाचा नीट अभ्यास न करता केलेल्या अशा आंदोलनांमुळे संघटनेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडियावरील युजर्सनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला आहे.
पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर याचा फोटो जाळला.