Saturday, May 10, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Gold Rate Today : सोन्याचा भाव थेट ९० हजारच्या घरात!

Gold Rate Today : सोन्याचा भाव थेट ९० हजारच्या घरात!

मुंबई: सोन्याचे दर (Gold Rate Today) कमी व्हायचं नावच घेत नाही. गेले काही दिवस सोन्याला सोन्यासारखे दिवस आलेले पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा भाव वाढतोच आहे. लग्नाचा हंगाम सुरु असल्याने सोन्याची मागणीही जास्त आहे. सोन्याची ही मागणी पाहता सोन्याची किंमत वाढताना दिसत आहे. लग्नाच्या हंगामात पिवळ्या धातूच्या किमतीने ऐतिहासिक टप्पा ओलांडला - प्रति १० ग्रॅम ९१,००० रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोंडीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असताना दिसत आहे. केवळ चार दिवसांत १० ग्रॅम सोन्याचा भाव २ हजार रुपयांनी वाढला आहे.



शनिवारी १० ग्रॅम सोन्याचा बाजारभाव करासह ९१,०५२ रुपये होता. शुक्रवारी तो ९१,६०० रुपये होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींना, ज्यामध्ये अमेरिकेने व्यापारावर केलेली कारवाई समाविष्ट आहे, बाजारभाव प्रतिसाद देत आहे. आजही, बरेच लोक सोने हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानतात. सोन्याच्या वायद्याची किंमत ही दिवसेंदिवस वाढताना दिसणार आहे. काही तज्ञांच्या मते, सोन्याची किंमत येत्या काळात अजून वाढताना दिसणार आहे.




सोन्याचा सराफा बाजारातील किंमत


सोन्याचे सराफा बाजारातील किंमतही तशी वाढलेलीच आहे. सोन्याच्या किंमती या ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. १० ग्रॅम प्रतिप्रमाणे २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ८२,१९० रुपये आहे. तर १० ग्रॅम प्रतिप्रमाणे २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ८९,६६० इतकी आहे. चांदीची किंमत ही एक लाखाच्या घरात असून आता १,०२,९०० इतकी आहे.

Comments
Add Comment