

Attack on Pakistan Army : बीएलएच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार
इस्लामाबाद : बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या संघटनेने दावा केला आहे की त्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाले. पाकिस्तानच्या लष्कराचा ...
स्वतंत्र बलूचिस्तानचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. नायला कादरी बलोच यांनी निर्वासित बलोच सरकारची स्थापना केली आहे. त्या स्वत: बलोच सरकारच्या पंतप्रधान आहेत, ज्याची स्थापना २१ मार्च २०२२ रोजी युरोपात केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे ठिकाण सार्वजनिक केले नाही. त्या सध्या कॅनडात राहत असल्याचं सांगितले जाते. नायला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळावे यासाठी अनेक देशांचा दौरा करतात.त्यांनी विशेषत: भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात बलुचिस्तानचा मुद्दा उचलून धरण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Abu Qatal killed : हाफिझ सईदचा विश्वासू सहकारी अबू कताल अज्ञातांच्या हल्ल्यात ठार
इस्लामाबाद : लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य आणि हाफिझ सईदचा विश्वासू अबू कताल (४३) उर्फ झिया-उर-रेहमान याची शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये ...
नायला यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार यांच्याकडे यूएनमध्ये बलूचिस्तानच्या समर्थनात उभे राहण्याची संधी आहे.जी कदाचित उद्या नसेल. नरेंद्र मोदींना बलुचिस्तानातील लोक नायक म्हणून पाहतात.जर भारताने युएनमध्ये बलूचिस्तानचे समर्थन केले तर स्वतंत्र बलूचिस्तान भविष्यात भारताचं समर्थन करेल. भारत आणि बलूचिस्तान यांच्यात खूप साम्य आहे. या दोन्ही देशांना धर्माच्या नावावर अन्याय केला गेला असंही त्यांनी सांगितले. परंतु भारत सरकारने अद्याप बलूचिस्तान निर्वासित सरकारला मान्यता दिली नाही.
दरम्यान, नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्येही नायला भारतात आल्या होत्या. बलूचिस्तानमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. पाकिस्तानी सैन्य बलूच लोकांच्या घराला आग लावत आहे. आमच्या बागा, शेती पेटवत आहे असं नायला यांनी भारतात आल्यावर म्हटलं होते.