Saturday, April 19, 2025
HomeदेशRam Mandir : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी...

Ram Mandir : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी रुपये

अयोध्या : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अयोध्येतील मंदिराच्या कामांना वेग आला. मंदिराची निर्मिती तसेच मंदिराशी संबंधित सर्व कामांची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अर्थात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची आहे. राम मंदिराचे आतापर्यंत ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराचे राहिलेले काम पण वेगात सुरू आहे. जून २०५ पर्यंत मंदिर निर्मितीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मंदिराशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकार दफ्तरी आतापर्यंत ३९६ कोटी रुपये जमा केले आहेत.

…म्हणून औरंगजेबाच्या कबरीला दिलं जातंय संरक्षण

Devendra Fadanvis : छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री फडणवीस

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सात ट्रस्टी अर्थात विश्वस्त आणि चार विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून केशव पराशरण, विमलेंद्र मोहन मिश्र, युगपुरुष परमानंद, नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. बैठकीत राम मंदिराच्या निर्मितीच्या प्रगतीवर चर्चा झाली. महामंत्री चंपत राय यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारी २०२० रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अर्थात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची स्थापना झाली. ट्रस्टच्या स्थापनेपासून ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत म्हणजेच मागील पाच वर्षात ट्रस्टच्या खात्यातून सरकारच्या विविध विभागांना ३९६ कोटी रुपये देण्यात आले. यात जीएसटी २७२ कोटी, टीडीएस ३९ कोटी, लेबर सेस १४ कोटी, ईएसआय ७.४ कोटी, विमा ४ कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणला ५ कोटी, अयोध्येतील जमीन खरेदीसाठी स्टँप ड्युटी अर्थात स्टँप शुल्क २९ कोटी, वीज बील १० कोटी, रॉयल्टी १४.९ कोटी रुपये यांचा समावेश आहे. दगडांची रॉयल्टी राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना देण्यात आली आहे.

मागील पाच वर्षाचत मंदिर निर्मितीवर २१५० कोटी रुपये खर्च झाले. हा निधी समाजाकडून ट्रस्टला मिळाला. सरकारी तिजोरीतून एक पैसा पण मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला नाही. मागील पाच वर्षात भाविकांनी ९४४ किलो चांदी दान केली आहे. ही ९२ टक्के शुद्ध चांदी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -