Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमनोरंजनमल्टिप्लेक्सताज्या घडामोडी

कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमात अभिनेत्री अलका कुबल, ऐश्वर्या यांचा सन्मान

कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमात अभिनेत्री अलका कुबल, ऐश्वर्या यांचा सन्मान
मुंबई : कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नुकत्याच संपन्न झालेल्या महिला दिन कार्यक्रमात अभिनेत्री अलका कुबल, ऐश्वर्या यांचा सन्मान करण्यात आला. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, मुंबईच्या सहसचिवअदिती अतुल तांबे असून विजय आंबर्डेकर आणि अंजली आंबर्डेकर या दांपत्याने संपूर्ण कार्यक्रमाची नियोजन केले. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून अलका कुबल-आठल्ये आणि ऐश्वर्या आठल्ये - नारकर यांनी काही किस्से सांगितले. "आपल घर" संचालिका साधना फळणीकर ह्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिला दिन म्हणून नृत्यात प्राविण्य मिळालेल्या कविता कोळी ह्यांचा सन्मान करण्यात आला. ह्या सर्वांनाही भेटवस्तू (पैठणी शेला, सन्मान पत्र, भेट वस्तू, सप्रे फूड प्रॉडक्ट आणि ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले. नात, मुलगी, आई, बहीण, पत्नी, आजी ह्या स्त्री च्या विविध रूपाचा सन्मान करण्याची कल्पना होती. त्यात आजी गटातील उपस्थिती तर लक्षवेधी ठरली. त्यांना मुकुट, सन्मान पट्टा, भेट वस्तू आणि सप्रे फूड प्रॉडक्ट तर्फे भेट देण्यात आली. मी सप्रे फूड प्रॉडक्टच्या संचालिका जान्हवी सप्रे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तसेच ह्या वर्षी विवाहाला ५० वर्ष झालेल्या दाम्पत्यांच्या सन्मानाचे स्वरूप सुद्धा वेगळे होते. पुरुषांना शेला आणि उपरणे आणि महिलांना पैठणी शेला देवून सन्मानित केले. कल्पना कोळी ह्यांनी सादर केलेला समूह नृत्याचा बहारदार कार्येक्रम झाला. तर कऱ्हाडे म्हणजे खवय्ये म्हणून रगडा पॅटीस, शेव बटाटा पुरी, पाव भाजी, दही बुट्टी आणि गाजर हलवा हे पदार्थ उदय पंडित ह्यांनी उत्तम बनवत कार्यक्रमाला एक वेगळीच बहार आणली.
Comments
Add Comment