PAK vs NZ : न्यूझीलंडच्या टिम रॉबिन्सनने घेतला अफलातून झेल; व्हिडिओ व्हायरल!

नवी दिल्ली : अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ग्लेन फिलिप्सने अनेक धोकादायक झेल घेऊन जगाला आश्चर्यचकित केले होते. यामुळे क्रिकेटक्षेत्रात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून क्रिकेटमध्ये त्याच्यासारखा क्षेत्ररक्षक नाही असे सर्वांना वाटत होते. मात्र नुकतेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड येथे झालेल्या सामन्यात टिम रॉबिन्सनने (Tim Robinson) हे चुकीचे सिद्ध केले आहे.



न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज (१६ मार्च २०२५) क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळला जात आहे. जिथे किवी खेळाडू टिम रॉबिन्सनने एक शानदार झेल घेऊन सर्वांना वेड लावले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीदरम्यान पाचव्या षटकात ही सुंदर घटना पाहायला मिळाली. यावेळी किवी वेगवान गोलंदाज काइल जेमीसन गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, पाकिस्तानी अष्टपैलू शादाब खानने (Shadab Khan) चौकार मारण्याच्या उद्देशाने त्याची बॅट बॅकवर्ड पॉइंटकडे जोरदारपणे वळवली. परंतु तिथेच असलेल्या रॉबिन्सनने डावीकडे जोरदार उडी मारून एक कठीण झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.


दरम्यान, रॉबिन्सनने घेतलेल्या या अफलातून झेलचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा शानदार झेल पाहून अनेकांना ग्लेन फिलिप्सची (Glenn Phillips) आठवण येत आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या