नवी दिल्ली : अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ग्लेन फिलिप्सने अनेक धोकादायक झेल घेऊन जगाला आश्चर्यचकित केले होते. यामुळे क्रिकेटक्षेत्रात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून क्रिकेटमध्ये त्याच्यासारखा क्षेत्ररक्षक नाही असे सर्वांना वाटत होते. मात्र नुकतेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड येथे झालेल्या सामन्यात टिम रॉबिन्सनने (Tim Robinson) हे चुकीचे सिद्ध केले आहे.
A. R. Rahman : ए. आर. रेहमान यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल!
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज (१६ मार्च २०२५) क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळला जात आहे. जिथे किवी खेळाडू टिम रॉबिन्सनने एक शानदार झेल घेऊन सर्वांना वेड लावले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीदरम्यान पाचव्या षटकात ही सुंदर घटना पाहायला मिळाली. यावेळी किवी वेगवान गोलंदाज काइल जेमीसन गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, पाकिस्तानी अष्टपैलू शादाब खानने (Shadab Khan) चौकार मारण्याच्या उद्देशाने त्याची बॅट बॅकवर्ड पॉइंटकडे जोरदारपणे वळवली. परंतु तिथेच असलेल्या रॉबिन्सनने डावीकडे जोरदार उडी मारून एक कठीण झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
दरम्यान, रॉबिन्सनने घेतलेल्या या अफलातून झेलचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा शानदार झेल पाहून अनेकांना ग्लेन फिलिप्सची (Glenn Phillips) आठवण येत आहे.