प्रहार    

प... सा... रा...

  31

प... सा... रा...

हलकं-फुलकं - राजश्री वटे


प... पसरलेलं हे कधी
आवरायचं
सा... सारं काही इतस्त:
विखुरलंय
रा... राहू द्यावं असंच की
आवरायला घ्यावं


माणूस जीवनाचा पसारा...
जन्मापासून... मरणापर्यंत...
जन्म झाला... लंगोटा, दुपटे, झबले, टोपडे घरभर बाळाचं लहानपण रांगतं आहे कपड्यांच्या पसाऱ्यात... बेबी पावडरच्या सुगंधात!


जरा पाय फुटू द्या... घरभर खेळणी व त्यांच्यातील वेगवेगळ्या आवाजाचा टिक टिक टॉक टॉकचा पसारा!
नंतर शाळेचा पसारा तर कित्येक वर्ष मानगुटीवर रेंगाळत असतो... गणवेष, पुस्तकं, बुटमोजे, प्रोजेकट्स, पेपर्स, त्यात कंपास बॉक्समधला पसारा तर काही विचारायलाच नको त्यातील अर्ध्या गोष्टींचा कधी वापर सुद्धा झालेला नसतो, पण तो असणं गरजेचं असतं...


मग कॉलेजमध्ये कपडे व पुस्तकं यांच्या पसाऱ्याबद्दल तर काही बोलायची सोयच नाही... जिकडे खुंटी तिथे कपडे मुलांचे व अभ्यासाची पुस्तकं तर टेबल सोडून सगळीकडे लोळत असतात अभ्यास करणाऱ्या सकट!!
एकदा जबाबदारी खांद्यावर आली की, आफिसमधील फायलींच्या पसाऱ्यातून डोकं वर काढायला फुरसत नसते... फायलींच्या पसाऱ्यातून संसाराच्या पसाऱ्यात नुसती ओढाताण असते जीवाची... काय करणार विश्व निर्मात्याने एवढा जगभराचा पसारा मांडून ठेवला आहे... त्यांच्या पसाऱ्यात स्वत्व शोधत अख्खं आयुष्य संपून जातं... आजूबाजूला समाजाचा, नात्यांचा पसारा असल्याशिवाय मात्र जीवनाला काही अर्थ नाही नक्कीच !!


पुरा संसार ही एक पसारा है...
‘‘जगीं हा खास वेड्यांचा l
पसारा माजला सारा l
गमे या भ्रान्त संसारी l
ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा ll”
या विश्वाच्या पसाऱ्यात
“रणदूदूंभी” या नाटकातलं पद नक्कीच आठवतं!!


पण मजेची गोष्ट ही की हा पसरलेला पसारा आवरायला स्त्री आपलं उभं आयुष्य घालवते...
पसरलेलं आवरत जाते, दमते, चिडचिड करते पण पुन्हा नव्या दमानं आवरून घराला घरपण देते...
संसार म्हणजे हेच की...
एकाने पसरवायचं दुसऱ्याने आवरायचं...
मग ते घर असो की मन !!
घराचा पसारा तरी लवकर आवरला जातो पण मनाचा पसारा... त्याला तर काही मर्यादाच नाही... तिथे सगळं अस्ताव्यस्त...


कुठे सुरू होतो अन् कुठे संपतो... कुठून सुरुवात करायची व कुठे संपवायची... अशक्य!!
स्त्रीच्या सगळ्यात जिव्हाळ्याची म्हणजे तिची पर्स... सगळं विश्व त्यात सामावलेलं असतं... काय नाही मिळत हो त्यात... नाव काढताच ते पर्समध्ये सापडलंच पाहिजे मग औषधं असो नाहीतर मेकअपचं सामान... आणि... आणि बरंच काही!
जेव्हा ती स्वयंपाकघरात पसारा करते तेव्हाच रुचकर पदार्थ ताटात पडतात... ड्रेसिंग टेबलवर सौंदर्य प्रसाधनाचा पसारा करते तेव्हा एक सुंदर स्त्री समोर येते... अंगणात रंगाचा पसारा घालतो तेव्हा अप्रतिम रांगोळी साकारते... शाई जेव्हा कागदावर अक्षरांचा पसारा घालते तेव्हा कुठे अप्रतिम लिखाणाचा साक्षात्कार होतो...
किती पसारा करू तितका कमीच आहे शब्दांचा इथे...
जितका आवरू कमीच आहे कारण पुन्हा पुन्हा त्याचं पुनःरुजीवन होणारच...
बघा, जमलं तर आवरा...
नाहीतर राहू द्या...!!

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा