कोल्हापूर : टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्या उड्डाणपुलाजवळ भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षांसह नऊ वाहनांना उडवले. या दुर्घटनेत राजारामपुरी येथील धीरज शिवाजीराव पाटील या ५५ वर्षांच्या उद्योजकाचा मृत्यू झाला. ते राजारामपुरीतील पाचव्या गल्लीत वास्तव्यास होते. कार चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि हा अपघात घडला, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केली आहे.
WPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग
Gold Rate Today : सर्वसामान्यांना दिलासा! सोन्याचे दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर काय?
कोल्हापूर शहरातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्या उड्डाणपुलाजवळ धीरज शिवाजीराव पाटील हे त्यांच्या कारमधून जात होते. ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते. यावेळी अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, मोपेड, दुचाकीसह एकूण नऊ वाहनांना धडक देऊन पुढे गेली. कार पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली.
A. R. Rahman : ए. आर. रेहमान यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल!
मध्यरात्र असल्याने या अपघातवेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घाबरलेले नागरिक पटकन रस्त्यावर आले. यावेळी रस्त्यावर तुटलेल्या वाहनांचा खच पडला होता. शिवाय, एक कार पुढे कचऱ्याजवळ जाऊन थांबलेली दिसली. हे बघून नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी धीरज पाटील यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली आणि धीर पाटील यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. कोल्हापूरमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो.